झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन - FORMER CM SHIBU SOREN PASSES AWAY

रांची : दिशाम गुरु आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन झालंय. त्यांनी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं. जिथं त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. त्यांना किडनीचा संसर्ग झाला होता. त्यांना ब्राँकायटिसचेही निदान झालं होतं.
"आज सकाळी ८:५६ वाजता शिबू सोरेन यांचं दीर्घ आजारानं निधन झालं हे कळविण्यास दुःख होत आहे." - डॉ. ए. के. भल्ला, अध्यक्ष, नेफ्रोलॉजी विभाग, सर गंगाराम रुग्णालय
राष्ट्रपती, राज्यपालांनी घेतली होती भेट : शिबू सोरेन यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचे पुत्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची सून कल्पना सोरेन देखील दिल्लीत पोहोचले होते. त्यांचा धाकटा मुलगा बसंत सोरेन देखील दिल्लीत दाखल झाले होते. शिबू सोरेन यांच्या आजाराची बातमी मिळताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार हे देखील शिबू सोरेन यांना भेटण्यासाठी गंगाराम रुग्णालयात पोहोचले होते.
वेगळ्या राज्याच्या चळवळीत मोलाचा वाटा : झारखंडच्या वेगळ्या राज्याच्या चळवळीत शिबू सोरेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हे उल्लेखनीय आहे. राज्य स्थापनेनंतर ते तीनदा झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांनीच झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली. ते सात वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. २००४ मध्ये ते मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय मंत्री देखील होते.
What's Your Reaction?






