आधार कार्ड अपडेट; नियमांमध्ये मोठा बदल, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड धारकांना काय करावे लागेल?
आधार कार्ड नवीन नियम: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयात मतदार याद्या अपडेट करताना आधार कार्डबाबत जोरदार युक्तिवाद झाला. यामध्ये, बोगस आधार कार्ड तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. UIDAI ने त्याविरुद्ध एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आधार कार्ड अपडेट: गेल्या काही वर्षांत, आधार कार्ड देशातील प्रत्येक नागरिकाचे एक प्रमुख ओळखपत्र बनले आहे. परंतु याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्ड हा भारतीयत्वाचा किंवा नागरिकत्वाचा पुरावा नाही. आधार कार्डच्या आधारे इतर अनेक कागदपत्रे तयार केली जातात. या प्रकारच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याची तयारी करत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) आधार कार्ड तयार करण्याचे नियम बदलत आहे. यामुळे, बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर परदेशी नागरिकांची ओळख पडताळली जाईल. तर मूळ भारतीयांचा डेटा सरकारकडे जमा केला जाईल.
नवीन आधार कार्ड तयार करण्याचे नियम अधिक कठोर केले जातील. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, सरकारने त्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. नागरिकांचे पासपोर्ट, रेशनकार्ड, जन्म प्रमाणपत्रे, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरचे शालेय प्रमाणपत्रे, पॅनकार्ड यांचा डेटा आधार कार्डने पडताळला जाईल. यासाठी ही सर्व माहिती ऑनलाइन सेव्ह केली जाईल. त्यांचे इंटरलिंकिंग आणि पडताळणी केल्यानंतर, आधार कार्ड संबंधित व्यक्तीला दिले जाईल. यामुळे बोगस कागदपत्रे तयार करून आधार कार्ड तयार करण्याच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.
कागदपत्रांची छाननी
UIDAI ने एक नवीन साधन वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आधार कार्डच्या नवीन नोंदणीसाठी कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जाईल. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, वीज बिल यासारख्या कागदपत्रांची क्रॉस-चेकिंग समाविष्ट असेल. केवायसी प्रक्रिया कडक केली जाईल.
घुसखोरांचा थवा
गेल्या काही वर्षांत, भारतात बांगलादेशी, रोहिंग्या आणि इतर घुसखोरांच्या वसाहती तयार झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये, देशविरोधी शक्ती या लोकांना भारतीय नागरिकत्व मिळविण्यात मदत करत आहेत. त्यांच्या बोगस जन्म प्रमाणपत्रांपासून ते शालेय प्रमाणपत्रांपर्यंत, बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. त्या आधारे त्यांचे रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्या आधारे या घुसखोरांना भारतात सुविधा मिळतात आणि ते येथे देशविरोधी कृत्ये करत असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारच्या कारवायांना आळा घालण्यासाठी आता एक व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
What's Your Reaction?






