इस्रायल-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्रीय मंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत, त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे

Jun 17, 2025 - 16:24
Jun 17, 2025 - 16:28
 0  0
इस्रायल-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्रीय मंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकची संपूर्ण जगभरात चर्चा होत असताना इस्रायलने तशाच प्रकारचा हल्ला इराणवर केला आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणच्या परमाणू संशोधन केंद्रावर, लष्करी तळांवर आणि रहिवासी क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या लष्करप्रमुखांसह इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या या हल्ल्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्ही देशांतील या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाचे दर भडकल्याने भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी उत्तर दिलं आहे.

इराण हा कच्चा तेलाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. भारतासह जगभरातील अनेक देश इराणकडून कच्च्या तेलाची आयात करतात. सध्या इस्रायल व इराणमध्ये संघर्ष पेटल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा फटका भारतालाही बसणार असून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी भारतातील इंधनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसह सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकही घेतली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0