फाईव्ह स्टार हॉटेलसाठी सुरु होतं खोदकाम, इतक्यात झाला पाऊस, मातीतून सोनं चमकलं, अख्खं गावच लोटलं..
मध्य प्रदेशातील छतरपुर जिल्ह्यातील एक हैराण करणारा प्रकार घडला आहे.येथे अलिकडे पाऊस पडल्यानंतर मातीतून गुप्त खजाना बाहेर पडला आहे.. त्यामुळे अख्खा गाव शोधासाठी जुंपला गेला आहे.
मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एक अनाकलनीय घटना उघडकीस आली आहे. दि ओबेरॉय राजगड पॅलेसच्या जवळ बांधकाम सुरु असताना मातीत अचानक सोन्याची नाणी सापडली आहेत. पावसाच्या पाणी पडताच ही नाणी लखलखू लागली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी रातोरात खोदकाम सुरु केले. माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोदकामा दरम्यान आपल्या पाचशे वर्षी जुनी सोन्याची नाणी सापडली आहेत असा दावा गावकऱ्यांनी केला. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बमीठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजगड गावात गुप्त धन सापडल्याची बातमी पसरताच हडकंप उडाला आहे. पाहाता पहाता अख्खे गाव या ठिकाणी खोदकामासाठी पोहचले. अनेकांनी मातीत सोन्याच्या मोहरांचा शोध सुरु केला. राजगड किल्ल्याच्या जवळ एक ओबेरॉय पॅलेस हॉटेल कर्मचाऱ्यासाठी स्टाफ क्वॉटर्स बांधण्यासाठी खोदकाम सुरु आहे. त्यावेळी मातीत खोदकाम सुरु असताना राडारोडा बाहेर टाकला जात असताना. यावेळी तेथे पाचशे वर्षे जुने नाणे सापडले. त्यामुळे गावकऱ्यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी येथे येऊन खोदकाम करायला सुरुवात केली.
सरपंचाचे काय म्हणणे ?
वसंत पंचमीच्या दिवशी झालेल्या जत्रेला भेट देणाऱ्या सुमारे एक ते दीड लाख भाविकांसाठी जमीन सपाटीकरणाचे काम केले जात आहे. यासाठी येथे एक ट्रॉली काळी माती मागवली होती. गावाची निवासी लक्ष्मी घोषीच्या शेजारी ही माती टाकली गेली. नंतर जेसीबी ही जमीन सपाट करण्यात आली. याच वेळी गावात पाऊस पडला. त्यावेळी एका मुलीची नजर मातीतून चमकणाऱ्या सोन्याच्या नाण्याकडे गेली. त्यानंतर हळूहळू ही बातमी पसरुन गावकऱ्यांनी येथे नाणी शोधण्यासाठी गर्दी केली असे गावाच्या सरपंचाने सांगितले.
नाव उघड झालेले नाही
सरपंचाने विचारले तर गावकऱ्यांनी खोटे सांगितले की सोन्याचा खिळा पडला आहे तो शोधत आहोत. त्यानंतर सरपंचाने माती सपाट करण्यास सांगितले. त्यानंतर शोधकार्यात गुंतलेल्या गावकऱ्यांपैकी कोणाला ३०, कोणाला ४०, कोणाला १०-१५ जुनी नाणी सापडली. मात्र हे सोने कोणाला सापडले याचे नाव उघड झालेले नाही. हळूहळू लोकांची नावे कळतील असे म्हटले जात आहे.
मध्य प्रदेशच्या सरकारने राजगड पॅलेसला ५ स्टार हॉटेलच्या रुपात संचालित करण्यासाठी ओबेरॉय समुहाला लीजवर दिले आहे. दि ओबेरॉय राजगड पॅलेस चंद्रनगरच्या जवळ मानगड आणि मनियागडच्या डोंगराच्या मध्यभागी हरिव्या बगिच्यात स्थित आहे.
बुदेंला राजवंशाने बांधलेला साडे तीनशे वर्षे जुना पॅलेस भारतीय स्थापत्य आणि पारंपारिक बुंदेलखंडच्या विशेषत:चे मिश्रण आहे. दि ओबेरॉय समुहाद्वारा विकसित राजगड पॅलेस हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी महलासारखा रेस्टॉरंट, भव्य बँक्वेट हॉल सह ६६ भव्य कक्ष आहेत. येथे कॉर्पोरेट आयोजनांसाठी, डेस्टीनेशन वेंडिग्स, सामजिक समारंभ आदीसाठी बुक केला जात आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0