लालबागच्या चरणी बिग बींचे लाखो रुपयांचे दान, चाहत्यांचा प्रश्न – पंजाबला मदत कधी?
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला तब्बल ११ लाख रुपयांचे दान केले आहे. त्यांच्या टीममार्फत हा धनादेश सादर करण्यात आला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
श्रद्धा की जबाबदारी?
एका बाजूला अनेकांनी बच्चन यांच्या श्रद्धा व उदारतेचे कौतुक केले, तर दुसरीकडे नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका केली. पंजाबमधील पुरस्थितीत हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असताना, तेथील मदतीसाठी योगदान का दिले नाही, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
-
“देवाला दान नको, पंजाबला मदत करा बाउजी”
-
“एक-दोन कुटुंबे दत्तक घेतली असती तर तेच खरे गणपतीचे पूजन ठरले असते.”
-
“सेलिब्रिटी नेहमी धार्मिक देणगीसाठी पुढे येतात, पण नैसर्गिक आपत्तीत फार कमी जण दिसतात.”
पंजाबची बिकट परिस्थिती
१९८८ नंतरचा सर्वात मोठा पूर पंजाबला झेलावा लागत आहे.
१,३०० हून अधिक गावे पाण्याखाली.
सुमारे ३ लाख एकर शेती बुडाली.
मृतांची संख्या सातत्याने वाढतेय.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0