WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडणार, बक्षिसाची रक्कम आणि सर्वकाही जाणून घ्या

Jan 8, 2026 - 19:53
 0  0
WPL 2026 : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडणार, बक्षिसाची रक्कम आणि सर्वकाही जाणून घ्या

WPL 2026 Schedule : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यावेळी नवा विजेता मिळणार की मुंबई आरसीबीपैकी जिंकणार? याची उत्सुकता आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ असून 28 दिवसात एकूण 22 सामने खेळले जाणार आहेत.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर क्रीडारसिकांना वुमन्स प्रीमियर लीगची मेजवानी मिळणार आहे. यंदा स्पर्धेचं चौथं वर्ष असून पाचही फ्रेंचायझींनी नव्याने संघ बांधला आहे. त्यामुळे यंदा तगडी स्पर्धा होणार यात काही शंका नाही. भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्याने भारतीय खेळाडूंचा उत्साह काही वेगळाच असेल यात काही दुमत नाही. मेगा लिलावानंतर संघात बरेच बदल झाले आहेत. काही खेळाडू या संघातून दुसर्‍या संघात गेले आहेत. तर काही नवीन खेळाडूंचा संघात समावेश झाला आहे. काही फ्रेंचायझींनी संघाचं नेतृत्वही बदललं आहे. नेतृत्व बदल करत जेतेपदाची आस फ्रेंचायझींना लागून आहे. पहिल्यांदाच जानेवारी-फेब्रुवारी विंडोमध्ये खेळली जात आहे. 9 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होईल. या स्पर्धेत एकूण 22 सामने होणार असून सुरूवातीचे 11 सामने नवी मुंबईत आणि उर्वरित 11 सामने वडोदऱ्यात होणार आहेत.

या संघांनी बदलले कर्णधार

दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा जेमिमा रॉड्रिग्सच्या हाती असणार आहे. तर यूपी वॉरियर्सने मेग लॅनिंगकडे कर्णधारपद सोपवलं आहे. एशले गार्डनर गुजरात जायंट्सची कर्णधार असणार आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हरमनप्रीत कौर आणि आरसीबीचं कर्णधारपद स्मृती मंधानाच्या खांद्यावर असेल. एलिस पेरी आणि एनाबेल सदरलँड हे स्टार खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेत खेळत नाहीत. दुसरीकडे बिग बॅश लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दिल्ली कॅपिटल्सची लिझेल ली आणि 16 अनकॅप्ड दिया यादव यांच्या खेळीकडे लक्ष असणार आहे. मुंबई इंडियन्सची वेगवान गोलंदाज मिली इलिंगवर्थचं नावही चर्चेत आहे.

WPL 2026 चे सामने तुम्ही कुठे पाहू शकता?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील. तर JioHotstar वर लाईव्ह स्ट्रिमिंग केले जातील. इतर देशांमध्ये विविध प्लॅटफॉर्मवर हे सामने पाहता पाहता येतील.

प्लेइंग 11 चे नियम आणि बक्षीसाची रक्कम

एका संघाला त्यांची प्लेइंग निवडताना काळजी घ्यावी लागणार आहे. कराण प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडू असू शकतात. पण असोसिएट देशाचा खेळाडू असेल तर त्यांना पाच विदेशी खेळाडू खेळवण्याचा पर्याय आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघाला 6 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. तर उपविजेत्या संघाला 3 कोटींची रक्कम मिळेल. तर सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, सर्वाधिक षटकार आणि इतर कामगिरींसाठी खेळाडूंना बक्षीस म्हणून रक्कम दिली जाईल.

WPL 2026 स्पर्धेतील सर्व संघ

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट साइवर-ब्रंट, हेले मॅथ्यूज, अमनजोत कौर, जी. कमलिनी, अमेलिया केर, शबनीम इस्माइल, संस्कृति गुप्ता, सजना सजीवन, राहिला फिरदौस, निकोला कॅरी, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, सइका इशाक, मिल्ली इलिंगवर्थ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: स्मृति मंधाना (कर्णधार), ऋचा घोष, श्रेयंका पाटिल, जॉर्जिया वोल, नादिन डी क्लर्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिन्से स्मिथ, प्रेमा रावत, अरुंधति रेड्डी, पूजा वस्त्राकर, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रथ्योषा कुमार, डी. हेमलता, सयाली सातघरे.

गुजरात जायंट्स: एशले गार्डनर (कर्णधार), बेथ मूनी, सोफी डिवाइन, रेणुका सिंह ठाकुर, भारती फुलमाली, तितास साधु, काशी गौतम, कनिका आहूजा, तनुजा कंवर, जॉर्जिया वेयरहैम, अनुष्का शर्मा, हॅप्पी कुमारी, किम गार्थ, यास्तिका भाटिया, शिवानी सिंह, डॅनी व्याट-हॉज, राजेश्वरी गायकवाड, आयुषी सोनी.

यूपी वॉरियर्स: मेग लॅनिंग (कर्णधार), श्वेता सहरावत, दीप्ति शर्मा, सोफी एक्लेस्टोन, फोएबे लिचफील्ड, किरण नवगिरे, हरलीन देयोल, क्रांति गौड़, आशा शोभना, डिआंड्रा डॉटिन, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, क्लो ट्रायॉन, सुमन मीना, जी त्रिशा, प्रतिका रावल, चार्ली नॉट.

दिल्ली कैपिटल्स: जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), शफाली वर्मा, मार्जियन कप्प, निकी प्रसाद, लॉरा वोल्वार्ड्ट, चिनेले हेनरी, श्री चरणी, स्नेह राणा, लिजेल ली, दीया यादव, तानिया भाटिया, ममता मादीवाला, नंदनी शर्मा, लुसी हॅमिल्टन, मिन्नू मणि, अलाना किंग.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0