राजेंद्र बनसोड यांना राष्ट्रपती पुरस्कार
अमरावती/२७- अमरावती विभागातील यवतमाळ येथील जिल्हा गृहरक्षक कार्यालयात कार्यरत असलेले केंद्रप्रमुख राजेंद्र बनसोड यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला. होमगार्ड पथकाच्या उत्कृष्ट कार्य, समर्पण आणि सामाजिक सेवेसाठी हे पदक दिले जाते. विविध जिल्ह्यांमध्ये कर्तव्यादरम्यान सक्रिय सहभाग घेऊन आपत्ती व्यवस्थापन, समाजसेवा, कायदा आणि सुव्यवस्था, जनजागृती आणि नागरी सुरक्षा कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राजेंद्र बनसोड यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याला हे पदक देण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात, होमगार्ड पथकातील पुरुष आणि महिला गृहरक्षकांनी बनसोड यांना राष्ट्रपती पदक जाहीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0