मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता राज ठाकरेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, ‘सातबारा कोरा यात्रेत
बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आली आहे.

मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या ‘सातबारा कोरा यात्रे’ला पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे गुरूवारी १० जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
What's Your Reaction?






