चिखलदऱ्यात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आता या ‘हे’ उपाय
प्रशासनाने आता आठवडाअखेरीस तीन दिवस वन-वे ची व्यवस्था लागू केली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार तसेच अन्य सुटीच्या दिवशी वन-वे वाहतूक राहणार आहे.
चिखलदरा येथे पावसाळी पर्यटनासाठी आठवडा अखेरीस मोठी गर्दी होते. गेल्या शनिवारी आणि रविवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आणि पर्यटकांचे हाल झाले. शनिवार आणि रविवारी दोन मार्गांवर एकमार्गी (वन-वे) वाहतूक व्यवस्था असतानाही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने आता आठवडाअखेरीस तीन दिवस वन-वे ची व्यवस्था लागू केली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार तसेच अन्य सुटीच्या दिवशी वन-वे वाहतूक राहणार आहे.
What's Your Reaction?






