आशिया कप २०२५: हार्दिक पंड्याकडे विक्रमाची संधी, फक्त ५ षटकार दूर

भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या आशिया कप २०२५ मध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे करू शकतो. फक्त ५ षटकार मारल्यानंतर हार्दिक भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनेल.

Sep 4, 2025 - 13:28
Sep 11, 2025 - 18:37
 0  1
आशिया कप २०२५: हार्दिक पंड्याकडे विक्रमाची संधी, फक्त ५ षटकार दूर

भारतासाठी टी-२० मधील सर्वाधिक षटकार (२०२५ पर्यंत)

  • रोहित शर्मा – २०५ षटकार

  • सूर्यकुमार यादव – १४६ षटकार

  • विराट कोहली – १२४ षटकार

  • केएल राहुल – ९९ षटकार

  • हार्दिक पंड्या – ९५ षटकार

हार्दिकला आता फक्त ५ षटकारांची गरज आहे. ते मारल्यानंतर तो रोहित, सूर्यकुमार आणि कोहलीनंतर चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

हार्दिकची टी-२० कारकीर्द

  • सामने: ११४

  • डाव: ९०

  • धावा: १,८१२

  • अर्धशतके:

  • चौकार: १३५

  • षटकार: ९५

काही सामन्यांमध्ये त्याने भारताचे नेतृत्वही केले आहे. आता आशिया कप त्याच्यासाठी विक्रम घडवून आणण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

आशिया कपमधील हार्दिकची आकडेवारी

  • सामने:

  • धावा: ८३ (सरासरी १६.६०)

  • विकेट्स: ११ (सरासरी १८.८१)

त्याची ऑलराउंड कामगिरीच टीम इंडियासाठी ताकद ठरली आहे.

आशिया कप २०२५ मध्ये भारताचे सामने

  • १० सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई

  • १४ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान (हाय-वोल्टेज सामना )

  • १९ सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

या सामन्यांत हार्दिक पंड्या जर फॉर्मात आला, तर तो नक्कीच षटकारांचे शतक पूर्ण करेल.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0