भारतीयांनो तुम्हाला अमेरिकेतून हाकलून दिले जाईल.. थेट इशारा, विद्यार्थी चिंतेत, आता..
टॅरिफचा मुद्दा असो किंवा H-1B व्हिसाचा मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला असून आता अमेरिकेच्या निशाण्यावर थेट भारतीय विद्यार्थी आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यासोबतच व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले असून प्रचंड निर्बंध लादले आहेत. H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला असून 88 लाख रूपये शुल्क व्हिसावर लावण्यात आले. अमेरिकेमध्ये H-1B व्हिसावर सर्वाधिक भारतीय लोक जाऊन नोकऱ्या करतात. त्यांना हा थेट फटकाच आहे. फक्त हेच नाही तर H-1B व्हिसावर जाणाऱ्या व्यक्तीला आपले सोशल प्रोफाईल ओपन ठेवावे लागेल. अमेरिकन दूतावास अधिकारी प्रोफाईल चेक करणार आहेत. सध्याच्या बदललेल्या प्रक्रियेमुळे H-1B व्हिसावर अमेरिकेत जाण्यास उशीर होत आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हिसाचे नियम अधिक कडक केली जात आहेत. यासोबतच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सध्या अमेरिकेच्या बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुढील काही काळात नियमांमध्ये बदल होऊ शकतात आणि अमेरिकेत येण्यास त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेत जे लोक व्हिसावर राहतात, त्यांनीही काही नियमांचे पालक करावे लागणार आणि नाही तर बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नुकताच आता अमेरिकेच्या सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना मोठा इशारा दिला असून थेट बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचेही म्हटले आहे.
अमेरिकेतली सध्याच्या तणावाचे पडसाद थेट विद्यार्थ्यांवर होताना दिसत आहेत. भारतातील अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना मोठा इशारा दिला. अमेरिकन कायद्याचे उल्लंघन केल्यास तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो, असेही सांगण्यात आले. तुमचा व्हिसा रद्द करून तुम्हाला अमेरिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
अमेरिकन दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, जर तुम्ही अमेरिकन कायदे मोडले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या विद्यार्थी व्हिसावर होऊ शकतो. एखाद्या प्रकरणात जर तुम्हाला अटक झाली तर तुमचा व्हिसा थेट रद्द केला जाईल. त्यावेळीच तुम्हाला अमेरिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
फक्त अमेरिकेतून बाहेरच काढले जाणार नाही तर भविष्यातही अमेरिकेचे दार कायमचे तुमच्यासाठी बंद राहिले. तुम्ही अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर जात असाल तर नियमात राहा आणि नियमांचे पालन करा.विनाकारण आपले शैक्षणिक भविष्य धोक्यात घालू नका, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0