मराठी मोर्चावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वाद?” मनसेचं सूचक वक्तव्य; म्हणाले, आंदोलन उग्र झाल्यामुळे…

परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी देणाऱ्या गृहविभागाने मराठी भाषिकांच्या मोर्चाला मात्र परवानगी दिली नाही. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केला.

Jul 8, 2025 - 17:25
Jul 8, 2025 - 17:27
 0  1
मराठी मोर्चावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वाद?” मनसेचं सूचक वक्तव्य; म्हणाले, आंदोलन उग्र झाल्यामुळे…

मीरा-भाईंदरमध्ये सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चालू आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहरामधील परप्रांतीय दुकानदारांनी, व्यावसायिकांनी मीरा-भाईंदर बंदची हाक दिली होती. तसेच मोर्चा देखील काढला होता. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज शहरातील मराठी भाषिकांनी मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढायचं ठरवलं होतं. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. तसेच, पोलिसांनी मनसे नेते, मराठी एकीकरण समितीचे सदस्य व अनेक आंदोलकांची धरपकड केली. यामुळे मराठी भाषिक अधिक आक्रमक झाल्याचं पाहिलं.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0