मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना : ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहिणींना त्यांचा हक्काचा पैसा कधी मिळणार? हा प्रश्न सध्या राज्यभरातील कोट्यवधी महिलांच्या ओठांवर आहे. ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर सुरू झाला असला तरी अनेक महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत.
ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी किती पैसे मिळतील?
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी मिळून एकूण ₹३,००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
-
हे पैसे एकत्रित मिळतील का वेगळ्या हप्त्यांमध्ये? – याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
-
अधिकृत तारखेची घोषणा – अजून झाली नाही.
सरकारकडून काय अपडेट?
🔹 महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे.
🔹 सुरुवातीला २ कोटी ६३ लाख महिलांची नोंदणी झाली होती. तपासणीनंतर हा आकडा २ कोटी ४८ लाखांवर आला आहे.
🔹 चुकीचे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
अपहाराचे धक्कादायक प्रकार
-
२,००० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्याचे समोर आले.
-
इतकेच नव्हे तर, १४ हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहिन योजना वापरून कोट्यवधींचा अपहार केला.
-
यावर सरकारने कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे.
महिलांची प्रतीक्षा अजूनही कायम
गणेशोत्सव जवळ आला, सणासुदीची तयारी सुरू झाली, पण लाडकी बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत.
अपेक्षा अशी आहे की, सप्टेंबर महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0