वंदे मातरमवरील चर्चा संघाचे कपडे फाडण्यासाठी?; उद्धव ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

Dec 11, 2025 - 19:23
Dec 11, 2025 - 19:24
 0  1
वंदे मातरमवरील चर्चा संघाचे कपडे फाडण्यासाठी?; उद्धव ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सध्या सुरू असलेल्या वंदे मातरमच्या चर्चेवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्दे उपस्थित करत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी जोरदार टीका केली. तसेच गोमांसांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं.  तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. मी गोमांस खातो. कोण मला आडवतो बघतो असं ते म्हणतात, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, तसेच यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

दिल्लीत संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं. ही बातमी जोरात चालली. संघाच्या कार्यालयासाठी मंदिर पाडलं, तुम्ही हे कृत्य करतात. मी मुख्यमंत्री असतना साधूची घटना घडली. त्याला सरकार जबाबदार आहे असं चित्र तुम्ही तयार केलं. साधू हत्याकांडावरून आमच्या सरकारला बदनाम केलं. त्या हत्याकांडातील व्यक्तीला भाजपमध्ये घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं का. लाज वाटली पाहिजे अमित शाह यांना आणि भाजपला त्यांनी माझ्या हिंदुत्वावर शंका घेतली, तुमच्या बुडाखाली काय आहे ते आधी पाहा, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोतलाना ते म्हणाले की, न्यायामूर्तींवरची केस पाहा. माझी न्यायामूर्तींनीही आक्षेप घेतला आहे. मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून वाद आहे. तिथे दिवा लावलाच पाहिजे. उत्सव साजरा झालाच पाहिजे. हिंदुत्वावरून अमित शाह यांनी शिकवू नये. वंदे मातरम ही चर्चा त्यांनी संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय अशी आता शंका येते. ते ज्यांना देव मानतात त्या शामाप्रसाद मुखर्जींचं सुद्धा मुस्लिम संघटनेंबरोबर काय साटंलोटं होतं, आणि त्यांनी चलेजाव चळवळीला कसा विरोध केला होता, फजरुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये यांचे देव, माझे नाहीत, शामाप्रसाद मुखर्जी देशप्रेम बाजूला ठेवून सामील झाले होते. हे सर्व आलं आहे. तीन ठिकाणी त्यांनी मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केलं होतं. हे त्यांचे राजकारणातील जन्मदाते त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं? असा थेट सवालच यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0