भारतातील सर्वात लांब पल्ल्याची 'वंदे भारत' महाराष्ट्रात धावली; नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात - VANDE BHARAT TRAIN

Aug 10, 2025 - 18:53
 0  0
भारतातील सर्वात लांब पल्ल्याची 'वंदे भारत' महाराष्ट्रात धावली; नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 12 तासात - VANDE BHARAT TRAIN

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू रेल्वे स्थानकावरून अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत हिरवा झेंडा दाखण्यात आला. यासोबतच त्यांनी केएसआर बंगळुरू- बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ केला. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर नागपूर रेलवे स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

कोणाला होणार फायदा : महाराष्ट्राला अजनी (नागपूर) ते पुणे स्वरूपात बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. वर्धा ते मनमाड दरम्यान अद्यापही वंदे भारत सेवेपासून वंचित असलेल्या भागास मिळालेली ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत सेवा दोन जलदगतीने विकसित होत असलेल्या महानगरा दरम्यान व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवासाला मोठी चालना देईल. व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटकांना याचा फायदा होईल.

सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस : अजनी (नागपूर)-पुणे वंदे भारत एक्सप्रेस 881 किलोमीटरचे अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल. महाराष्ट्रातील ही बारावी वंदे भारत आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन या मार्गावर ही गाडी धावेल.



नागपूर-पुणे या शहरांना जोडणारी वैशिष्ट्य : नागपूर शहराला 'ऑरेंज सिटी' म्हणून तर सर्वत्र ओळख आहे. त्याचबरोबर नागपूर हेल्थकेअर सिटी म्हणून देखील मध्यभारतात प्रसिद्ध आहे. शिवाय महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणूनही प्रसिद्ध आहे. नागपूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी अतिशय निकटचा संबंध असलेले शहर देखील आहे. दीक्षाभूमीत बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला असून,येथे दरवर्षी लाखो भाविक येतात. रामटेकचे प्राचीन श्रीराम मंदिर व इतर धार्मिक स्थळे येथे आहेत. एम्स सारख्या अनेक नामांकित वैद्यकीय संस्था विदर्भातील रुग्णांना सेवा देत आहेत.नागपूरला "टायगर कॅपिटल ऑफ इंडिया" असे म्हणतात कारण परिसरात अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत.

नियमित सेवा तपशील या प्रमाणे आहे : गाडी क्र. 26101 पुणे-अजनी (नागपूर) वंदे भारत एक्सप्रेस 11.08.2025 पासून आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 06:25 वाजता पुणे येथून सुटून संध्याकाळी 18:25 वाजता अजनी येथे आगमन तर गाडी क्र. 26102 अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस – 12.08.2025 पासून आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता) सकाळी 09:50 वाजता अजनी येथून सुटून रात्री 21:50 वाजता पुणे येथे आगमन होईल एकूण 8 कोच असतील त्यात 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहेत, तर 7 चेअर कार कोच असून एकवेळी 590 प्रवासी प्रवास करू शकतील.

किती आहे तिकीट? :

  • अजनी ते पुणे - 2140 रुपये (चेयर कार), 3815 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)
  • वर्धा ते पुणे - 2040 (चेयर कार), 3650 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)
  • बडनेरा ते पुणे - 1905 (चेयर कार), 3405 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)
  • अकोला ते पुणे - 1825 (चेयर कार), 3210 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)
  • शेगाव ते पुणे - 1795 (चेयर कार), 3150 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)
  • अहमदनगर ते पुणे - 750 (चेयर कार), 1270 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)
  • अहमदनगर ते शेगाव - 1340 (चेयर कार), 2360 (एक्झिकेटिव्ह चेयर कार)

    वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये :

    - पूर्ण वातानुकूलित कोच

    - ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण

    - आरामदायी एर्गोनॉमिक सीट्स,LED एंबियंट लाइटिंग

    - मोठी पॅनोरमिक खिडक्या- बायो-वॅक्यूम शौचालये

    - अग्निसुरक्षा प्रणाली, CCTV देखरेख, इंटरकॉम सुविधा

    - रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली (30% ऊर्जा बचत)

    - ड्युअल सस्पेंशन सिस्टम

    – उच्च वेगावरही आरामदायी प्रवास'मेक इन इंडिया' उपक्रमाचे प्रतीक असलेली ही गाडी आधुनिक तंत्रज्ञान व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0