शेतकऱ्यांची पुन्हा पेरणीची वेळ, विदर्भात पावसाने हाहाकार
खापरखेडा आणि वलनी परिसरात संततधार पावसामुळे सोयाबीन, तूर व कपाशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीची वेळ आली आहे.

पाणीच पाणी... सोयाबीन, तुरी, कपाशी पाण्याखाली; शेतकऱ्यांची पुन्हा पेरणीची वेळ, विदर्भात पावसाने हाहाकार खापरखेडा जवळील वलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने शेतात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, सोयाबीन, कपाशी आणि तुरीसारखी खरीप पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. परिणामी अनेक शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली आहेगेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील कन्हान व कोलार नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरले असून, रस्ते, पांधन आणि शेतीच्या बांधाही वाहून गेल्या आहेत.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात पावसाने दांडी मारली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, त्याने अक्षरशः झड दिली.यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आणि पिकांचे नुकसान झाले. निसर्गाच्या या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी योग्य वेळ मिळालेला नसून, अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहेपिकांची पूर्ण हानी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दोबारा पेरणी करावी लागणार आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
What's Your Reaction?






