संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध; स्वत: दिली माहिती!

आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरु आहेत. यातून मी लवकरच बाहेर पडेन, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बं घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज असल्याचे राऊत म्हणाले. मी ठणठणीत बरा होऊ साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहूद्या, असे राऊत म्हणाले.

Oct 31, 2025 - 14:21
 0  15
संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध; स्वत: दिली माहिती!

संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झालाय. त्यांच्या गर्दीत मिसळण्यावर निर्बंध आले आहेत. संजय राऊतांनी स्वत: याबद्दल अपडेट दिली. 

आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरु आहेत. यातून मी लवकरच बाहेर पडेन, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय

वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बं घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज असल्याचे राऊत म्हणाले.  मी ठणठणीत बरा होऊ साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहूद्या, असे राऊत म्हणाले. 

राऊतांचं बावनकुळेंना चॅलेंज 
काही दिवसांपुर्वीच संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांना खुलं चॅलेंज दिलंय.राज्यातील भाजप नेत्यांमागे आरोपांचं ग्रहण लागलं आहे. मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील इशारा देण्यात आला. दोन आठवड्यात बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय. शेतक-यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत राऊतांनी बावनकुळेंना लक्ष्य केले. तर राऊतांच्या इशा-यानंतर बावनकुळेंनी देखील खुलं चॅलेंज दिले.बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतक-यांची कर्जमाफी होईल असा दावाही राऊतांनी केला. दरम्यान माझी प्रॉपर्टी विकून राऊतांनी शेतक-यांची कर्जमाफी करावी असं आव्हान बावनकुळेंनी दिले. संजय राऊतांनी बावनकुळेंना इशारा दिल्यानंतर भाजप नेते देखील आक्रमक झालीय. संजय राऊत स्वत:चं भ्रष्टाराच्या प्रकरणात जामिनावर आहेत. त्यामुळे त्यांना बावनकुळेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका नवनाथ बन यांनी केली. संजय राऊतांनी बावनकुळेंना दोन आठवड्यांचा अल्टिमेटम दिलाय. तर बावनकुळेंनी देखील राऊतांना प्रतिआव्हान दिलंय. त्यामुळे राऊत बावनकुळेंच्या कोणत्या भ्रष्टाचाराची फाईल उघडणार याकडे आता लक्ष लागले आहे.

राऊतांचा एकनाथ शिंदेंना सल्ला
गृहमंत्री अमित शाहांच्या कुबड्यांच्या विधानावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना सल्ला देत खोचक टोला लगावलाय. भाजपला कुबड्यांची गरज नसल्याचं अमित शाह स्पष्ट बोलले. त्यांनी शिंदे, अजित पवारांचा अपमान केलाय त्यामुळे दोन्ही नेत्यांना राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला संजय राऊतांनी दिलाय.संजय राऊतांच्या सल्ल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंनी पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या फेकण्याचा सल्ला देत आनंद परांजपे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. अमित शाहांच्या विधानानंतर विरोधकांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. दरम्यान यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कुबड्यांचा अर्थ कळला नसल्याचं म्हणत पलटवार केला होता. मात्र, शाह कुबड्या कोणाला म्हणाले हे ज्ञानी लोकांना समजल्याचं म्हणत आव्हाडांनी देखील टोला लगावलाय.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0