रवी राणांची बच्चू कडूंवर थेट नामोच्चाराशिवाय टीका “जिल्ह्यात टपोरी लोक आहेत… स्वत:ला शेतकरी नेते म्हणवणारे”
बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडूंवर अप्रत्यक्ष टीका केली. “जिल्ह्यात टपोरी लोक आहेत, स्वत:ला शेतकरी नेते म्हणवतात” असे वक्तव्य करून राणा यांनी नव्या राजकीय संघर्षाची चाहूल दिली आहे.
अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सतत आक्रमक असलेल्या बच्चू कडूंचा ‘टपोरी’ असा उल्लेख करून राणा यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
राणा म्हणाले, “जिल्ह्यात काही टपोरी लोक आहेत. स्वत:ला शेतकरी नेते म्हणवणारे हे लोक राज्यभर फिरतात. त्यांच्या संपत्तीची संपूर्ण यादी माझ्याकडे आहे. त्यांनी आपल्या संपत्तीतील केवळ दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी खर्च केली, तरी खरी माणुसकी दाखवता येईल.”
गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राणा यांची ही टीका लक्षवेधी ठरली आहे.
यापूर्वीही लोकसभा निवडणुकीदरम्यान राणा-कडू संघर्ष चव्हाट्यावर आला होता. प्रहार संघटनेतर्फे उभ्या केलेल्या उमेदवाराने नवनीत राणा यांना दिलेली टक्कर, मातोश्रीवरून मिळालेला पाठिंबा, न्यायालयात जाण्याचे इशारे आणि परस्परांवर केलेले आरोप-प्रत्यारोप यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तणाव वाढला होता.
आता पुन्हा एकदा राणा यांच्या वक्तव्यामुळे या संघर्षाला नवा अध्याय मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0