इंग्लंड दौऱ्याआधी गिल-गंभीरकडून मोठी चूक? 'या' खेळाडूला संधी न दिल्यामुळे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष निवडकर्त्यावर संतापले
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी श्रेयस अय्यरने शक्य ते सर्व केले.

IND Vs ENG Test Series : टीम इंडियाचा आगामी इंग्लंड (INDIA VS England) दौरा आता चांगलाच चर्चेत आहे. 20 जूनपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या भारतीय संघात काही मोठे चेहरे वगळण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक गाजलेलं नाव म्हणजे श्रेयस अय्यर(Shreyas Iyer). आयपीएल 2024 मध्ये केकेआरला चॅम्पियन बनवले. भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्भुत कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आणि आयपीएल 2025 मध्येही चमकला... इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी श्रेयस अय्यरने शक्य ते सर्व केले. पण, असे असूनही पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अय्यरला दुर्लक्षित करण्यात आले.
अय्यरच्या नावाबद्दल फारशी चर्चा झाली नसल्याच्या बातम्या आल्या. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यासाठी अय्यरला दुर्लक्षित केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने निवडकर्त्यांवर टीका केली आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष निवडकर्त्यावर संतापले
सौरव गांगुलीने रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना अय्यरला संघात घेतले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "श्रेयस अय्यर गेल्या एका वर्षात उत्तम क्रिकेट खेळत आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत इंग्लंडसाठी निवडलेल्या संघात असायला हवा होता. गेल्या एक वर्षाचा काळ त्याच्यासाठी अद्भुत होता. अय्यरसारख्या क्षमतेच्या खेळाडूला वगळता कामा नये. तो सध्या दबावाखाली धावा करत आहे आणि जबाबदारी घेत आहे. यासोबतच तो शॉर्ट बॉल देखील चांगला खेळत आहे. जरी कसोटी क्रिकेट वेगळे असले तरी याला या मालिकेत खेळताना पहायचे होते."
बुमराह ठरणार 'ट्रम्प कार्ड'
जसप्रीत बुमराहबाबत सौरव गांगुलीने सांगितले की तो इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासाठी ट्रम्प कार्ड ठरेल. तो म्हणाला, "जसप्रीत बुमराह हा मोठा ट्रम्प कार्ड असेल. पण तुम्ही त्याला सतत गोलंदाजी करायला लावू शकत नाही हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. शुभमन गिलने हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला विकेट घेण्यासाठी बुमराहचा वापर करावा लागेल. त्याला एका दिवसात 12 पेक्षा जास्त षटके गोलंदाजी करायला लावू नये. इतर गोलंदाजांना पुढे येऊ द्या. जर तुम्ही बुमराहला हाताळण्यात यशस्वी झालात आणि त्याला विकेट घेणारा गोलंदाज म्हणून वापरलात तर तुम्हाला जिंकण्याची चांगली शक्यता आहे."
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आकाश दीप, अर्शदीप सिंग.
भारताचा इंग्लंड दौरा वेळापत्रक
पहिली कसोटी : 20-24 जून- हेडिंग्ले
दुसरी कसोटी : 2-6 जुलै- एजबॅस्टन
तिसरी कसोटी : 10-14 जुलै- लॉर्ड्स
चौथी कसोटी : 23-27 जुलै- ओल्ड ट्रॅफर्ड
पाचवी कसोटी : 31 जुलै-4 ऑगस्ट- द ओव्हल
What's Your Reaction?






