रोहित आणि विराट तिसऱ्या कसोटीत मैदानात दिसणार

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इंग्लंडच्या दौऱ्यात खेळण्याची इच्छा होती. पण या दोघांनी निवृत्ती घेतली असली तरी हे दोघेही आता तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात दिसणार असल्याचे समोर येत आहे. बीसीसीआय

Jul 9, 2025 - 18:41
 0  0
रोहित आणि विराट तिसऱ्या कसोटीत मैदानात दिसणार

 तिसरा कसोटी सामना भारतासाठी महत्वाचा असणार आहे, कारण हा सामना भारताने जिंकला तर त्यांना मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवता येणार आहे. या कसोटीत आता रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही मैदानात दिसणार असल्याचे समोर आले आहे. कारण बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ही मोठी अपडेट आता समोर आली आहे.इंग्लंडच्या दौऱ्यासाठी जेव्हा भारताचा संघ निवडण्याची वेळ आली तेव्हा एकामागून एक दोन धक्के भारताला बसले. कारण सुरुवातीला रोहित शर्मा आणि त्यानंतर विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. पण या दोघांनाही मालिकेत क्रिकेट खेळायचं होतं. पण निवड समितीने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि या दोघांनाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. पण आता लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित आणि विराट मैदानात येणार असल्याचे आता समोर येत आहे.शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्याच्या घडीला दमदार कामगिरी करत आहे. तिसरा सामना जिंकून ते मालिकेत आघाडी घेऊ शकतात. पण हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानात दाखल होऊ शकतात. कारण सध्याच्या घडीला विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे बीसीसीआयने त्यांना या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे दोघे या सामन्यासाठी मैदानात येऊ शकतात. कारण हे दोघेही इंग्लंडमध्येच आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयच्या निर्णयानंतर एक मोठी अपडेट भारताच्या चाहत्यांना मिळू शकणार आहे.भारतीय संघ सध्याच्या घडीला दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विकाट कोहली संघातील खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी येणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दिसतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0