देहरादून सहस्त्रधारा कारलीगाढ येथे भीषण ढगफुटी, PM मोदी-अमित शाह यांनी घेतली माहिती
उत्तराखंडच्या देहरादून सहस्त्रधारा कारलीगाढ भागात रात्री ढगफुटीची घटना. अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे अनेक दुकाने वाहून गेली. PM मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली.
देहरादून (उत्तराखंड): सहस्त्रधारा परिसरातील कारलीगाढ येथे रात्री उशिरा झालेल्या ढगफुटीमुळे परिसरात प्रचंड हाहाकार माजला. अचानक आलेल्या पाण्याच्या पुरामुळे अनेक दुकाने वाहून गेली तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) व राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (SDRF) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम रात्रीपासूनच सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्री धामी यांनी ट्विट करत सांगितले की, "या आपत्तीत दुकानदारांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासन व पोलीस दल पूर्ण ताकदीने मदतकार्य करत आहेत."
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. बेपत्ता दोन्ही व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून बचाव कार्य अजूनही सुरु आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0