भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ

Sep 29, 2025 - 12:56
Sep 29, 2025 - 13:03
 0  28
भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ

मुर्तीजापुर तालुक्यातील ग्राम उमई येथे भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून बदल्याच्या भावनेतून झालेल्या हल्ल्यात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन विश्वास मानकर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून दीपक अवधूत वानखडे याला शेतातल्या विळ्याने पोटात वार करून ठार मारले. तर, श्रीराम पांडोजी वानखडे याला देखील विळा व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, तसेच मुर्तीजापुर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्रीधर गुट्टे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

गंभीर अवस्थेत असलेल्या श्रीराम वानखडे यांना उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. ग्रामीण पोलिसांनी आरोपी गजानन मानकर याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेदरम्यान मुर्तीजापुर आपत्कालीन पथकाने तातडीने मदतकार्य केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0