मराठी माणूस पंतप्रधान व्हावा का? अमृता फडणवीस यांचं सूचक विधान; का होतेय चर्चा?

Dec 11, 2025 - 19:20
 0  0
मराठी माणूस पंतप्रधान व्हावा का? अमृता फडणवीस यांचं सूचक विधान; का होतेय चर्चा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा का? यावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. 2024 साली झालेल्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे हे राज्याचे नेतृत्व करत होते, मात्र निवडणुकीनंतर राज्याची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे आली. फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आता आगामी काळात देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचीही चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या समर्थकांनी ते पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात असंही म्हटलं आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा का? यावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल येथे अमृता फडणवीस यांची हजेरी
मुंबईतील गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल येथील अशोक वर्धन बिर्ला आणि सुनंदा अशोक वर्धन बिर्ला यांच्या संगमरवरी अर्थ पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी अमृता देवेंद्र फडणवीस या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, आज मला खूप आनंद झाला, यश बिर्ला यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलावलं आहे. टेक्निकल असा आरोबेल लॅब सुद्धा यांनी सुरू केला आहे. हे एक मॉडर्न स्कूल आहे. ज्यामध्ये मुलांना आजची टेक्नॉलॉजी शिकता येत आहे. टेक्नॉलॉजिकली हुशार होणे पुढच्या पिढीसाठी गरजेचे आहे.

पुढे बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, ‘ज्या प्रकारे गोपी बिर्ला त्यांच्या मुलांनी आतापर्यंत या शाळेसाठी केले काम त्याबद्दल यश बिर्ला आणि निवान बिर्ला यांचे खूप अभिनंदन. आताच्या आधुनिक काळात त्यांनी शाळेमध्ये अनोखे उपक्रम विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सुरू केले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकण्याचे काम या शाळेने केले आहे. रोबोटिक पद्धतीने शिक्षण देण्यात येणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत अभिमान वाटत असेल की त्यांची मुळे आता नव्या युगाच्या शाळेत शिकत आहेत. या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले पाहिजे.

मराठी माणूस पंतप्रधान व्हावा का?
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान बनण्याबाबत भाष्य केले होते. यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटले की, ‘बेस्ट ऑफ लक! पृथ्वीराज चव्हाण यांना वाटतं असेल मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्यांना शुभेच्छा! काम करणारा माणूस पुढे जावा, आपला मराठी माणूस सुद्धा काम करतोच. मराठी माणूसच काम करणारा पुढे जावा असंही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0