बाकड्यावर बसण्याचा किरकोळ वाद नि हत्येचा थरार, किशोरवयीन मुलांमधील ही क्रुरता तुम्हाला ही हदरवणार

Aug 3, 2025 - 10:57
 0  1
बाकड्यावर बसण्याचा किरकोळ वाद नि हत्येचा थरार, किशोरवयीन मुलांमधील ही क्रुरता तुम्हाला ही हदरवणार

Nashik Crime News : नाशिकमधून एक हदरवणारी घटना समोर आली आहे. बाकड्यावर बसण्याच्या किरकोळ वादातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांमधील ही क्रुरता का वाढत आहे, असा सवाल करण्यात येत आहे.

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाकड्यावर बसण्याच्या किरकोळ वादातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. सातपूर परिसरातील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. हा सगळा प्रकार एका खासगी क्लासेसच्या आवारात घडला. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहो. पोलिसांना दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

खाजगी क्लास मध्ये बेंच वर बसण्याहून झालेल्या वादात शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. नाशिकच्या सातपूर भागातील धक्कादायक घटनेने समाजमन हेलावले आहे. सातपूर भागात असलेल्या ज्ञानगंगा क्लास मध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या झाली. मयत यशराजचे त्याच्या क्लास मध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसोबत बेंच वर बसण्याहून बुधवारी वाद झाला होता. तेव्हापासून आरोपी त्याला सारखे डिवचत होते आणि खुन्नस देत होते.

अशोकनगरातील यशराज तुकाराम गांगुर्डे हा नेहमीप्रमाणे 2 ऑगस्ट रोजी त्याच भागातील राज्य कर्मचारी वसाहतीतील ज्ञानगंगा क्लास या खासगी शिकवणीसाठी गेला होता. पण थोड्या वेळानंतर तो हिरे गार्डन येथे सायंकाळी 6.15 वाजता बेशुद्धावस्थेत आढळला होता. रिक्षाचालक नवनाथ अवचार यांनी त्याला तातडीने औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

या वादातून यशराजला खाजगी क्लासच्या आवारात त्याच्याच शिकवणीमधील शिकणाऱ्या 2 मित्रांनी मारहाण केली. हाताच्या चापटी आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत यशराज याचा मृत्यू झाला. यशराज गांगुर्डे हा या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्याने प्राण सोडले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या हत्ये प्रकरणी 2 विधी संघर्षात बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तपास सुरू आहे. मुलांची चौकशी करण्यात येत आहे. पण या घटनेने लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती पालकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0