एआयमुळे गुगलच्या 1 लाखापेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ? सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडले माैन, म्हणाले..

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या धोक्यात येण्याच्या भीतीवर भाष्य केले आहे. एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट कर्मचाऱ्यांसाठी ते मदतीचे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Jun 13, 2025 - 16:51
Jun 14, 2025 - 15:30
 0  1
एआयमुळे गुगलच्या 1 लाखापेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ? सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडले माैन, म्हणाले..

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे नोकऱ्या धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता त्यावरच
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी याबद्दल भाष्य केले आहे. एआयमुळे 1.80 लाख नोकऱ्या धोक्यात असल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट मत मांडले. एआयचा वापर कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कंपनी नवीन उत्पादने आणि नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करत असून त्यामुळे भविष्यात अधिक नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि नोकऱ्यांवरील धोक्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. पिचाई यांनी स्पष्ट केले की, एआयमुळे नोकऱ्या जाणार नसून कर्मचाऱ्यांना त्याच्यामुळे कामात मदत होईल. त्यांनी एआयला कामात वेग वाढवण्याचे टूल असल्याचे म्हटले. एआयच्या मदतीने काम जास्त वेगाने होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

एआयमुळे गुगलमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार नाही तर भविष्यात वाढेल. एआयच्या मदतीने नवीन उत्पादने तयार केली जातील आणि त्यामुळे अधिक लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. गुगलमध्ये यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकले गेले आहे, हे खरे आहे. 2023 मध्ये कंपनीने 12000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि गेल्या वर्षी 1000 हून अधिक लोकांना कमी केले. 2025 मध्ये ही संख्या खूपच कमी असल्याचे पिचाई यांनी सांगितले.

यावर्षी क्लाउड टीममधील 100 पेक्षा कमी आणि डिव्हाइसेस युनिटमधील काही कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. एआय कर्मचाऱ्यांसाठी एक सहाय्यक म्हणून काम करेल, तो त्यांचा दुश्मन नक्कीच नाहीये. कंपनीचा भर नवीन उत्पादने आणि नवकल्पनांवर आहे, ज्यामुळे भविष्यात आणखी नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले की, एआयमुळे कर्मचाऱ्यांना घाबरून जाण्याची अजिबातच गरज नाहीये. एआय कोणाच्याही नोकऱ्या काढून घेणार नाही, उलट कामात मदत करेल. भविष्यात गुगलमधील नोकऱ्या वाढतील, कमी होणार नाहीत, असेही पिचाई यांनी म्हटले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0