इस्रायलकडून इराण टार्गेट, इराणचाही पलटवार, पण मुस्लीम देश असूनही जाॅर्डन मध्ये का येतोय? इराणी ड्रोन पाडून इस्त्रायलला मदत कशासाठी?

गेल्यावर्षीही इराणने इस्त्रायलवर 300 ड्रोन डागली होती. मात्र, जाॅर्डनने आपल्या हवाई हद्दीत येताच ती पाडली होती. त्यामुळे इस्त्रायलविरोधात मुस्लीम देश असतानाही जाॅर्डनच्या भूमिकेवरुन चर्चा रंगली होती.

Jun 13, 2025 - 16:31
Jun 14, 2025 - 15:32
 0  0
इस्रायलकडून इराण टार्गेट, इराणचाही पलटवार, पण मुस्लीम देश असूनही जाॅर्डन मध्ये का येतोय? इराणी ड्रोन पाडून इस्त्रायलला मदत कशासाठी?

युद्धखोर इस्त्रायलने गाझापट्टीत नरसंहार सुरुच ठेवला असताना आज (13 जून) सकाळी इराणवरही हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणी लष्कर प्रमुख, स्पेशल फोर्सचे प्रमुख ठार झाले आहेत. इतकेच नव्हे तर दोन अणूकेंद्र आणि दोन लष्करी तळ सुद्धा उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे इराण आणि इस्रायलच्या वादामध्ये आणखी ठिणगी पडली आहे. दरम्यान, इराणकडून सुद्धा आता प्रत्युत्तर दाखल 100 ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. मात्र, ही ड्रोन पोहोचण्यापूर्वीच जॉर्डनमध्ये पाडण्यात आली आहेत. त्यामुळे जॉर्डन पुन्हा एकदा इस्त्रायलाच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्यामुळे इराण आणि जॉर्डन मुस्लिम देश असूनही इस्त्रायलला पूरक भूमिका का घेत आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्यावर्षीही इराणने इस्त्रायलवर 300 ड्रोन डागली होती. मात्र, जाॅर्डनने आपल्या हवाई हद्दीत येताच ती पाडली होती. त्यामुळे इस्त्रायलविरोधात मुस्लीम देश असतानाही जाॅर्डनच्या भूमिकेवरुन चर्चा रंगली होती. त्यामुळे हा विरोधाभास समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. यामागे कोणती कारणे आहेत हे आपण समजावून घेणार आहोत. 

इस्लाम धर्मीय देश असूनही जॉर्डनचे इस्रायलशी सहकार्य 

इस्लाम धर्मीय देश असूनही जॉर्डन इस्रायलशी सहकार्य करतो, यामागे अनेक राजकीय आणि धोरणात्मक कारणं आहेत. इस्रायल आणि जॉर्डन यांच्यात 1994 मध्ये शांतता करार झाला असून, त्यानंतर दोन्ही देशांनी सुरक्षा, पाणी आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य सुरू ठेवलं आहे. जॉर्डनची इस्रायलसोबत लांब सीमा आहे आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतात. जॉर्डनला इराणचा वाढता प्रभाव आणि दहशतवादी गटांशी संबंध यामुळे धोका वाटतो. इस्रायलही इराणविरोधी भूमिका घेत असल्यामुळे या दोघांचे सामायिक हितसंबंध निर्माण झाले आहेत. जॉर्डन हा अमेरिका आणि पश्चिमी देशांचा महत्त्वाचा मित्र आहे. इस्रायलशी सहकार्यामुळे त्याला अमेरिकेकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळते. याशिवाय, जॉर्डन इस्रायलकडून डिसॅलिनेटेड पाणी आणि नैसर्गिक वायू खरेदी करतो, जे त्याच्या जनतेसाठी अत्यावश्यक आहे.

जॉर्डन इस्रायलला मदत का करतो?

1. 1994 मधील शांतता करार 

  • जॉर्डन आणि इस्रायल यांच्यात 1994 साली शांतता करार झाला.
  • दोन्ही देश एकमेकांसोबत सुरक्षा, पाणी वाटप आणि आर्थिक सहकार्य करतात.

2. सीमा नियंत्रण आणि सुरक्षा 

  • जॉर्डनची इस्रायल व वेस्ट बँकसोबत लांब सीमा आहे.
  • आतंकवादी घुसखोरी, शस्त्रसाठा रोखण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करतात.

3. स्थिरता सर्वात महत्त्वाची 

  • जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरा देशांतर्गत व प्रादेशिक स्थिरतेला प्राधान्य देतात. 
  • इस्रायलसोबत शांत संबंध ठेवणे म्हणजे संघर्ष टाळणे आणि देश सुरक्षित ठेवणे.

4. इराणविरोधी भूमिका 

  • जॉर्डनला इराणचा प्रादेशिक प्रभाव धोकादायक वाटतो (विशेषतः हिजबुल्ला, सीरिया, इराकमधील इराणसमर्थित गट).
  • इस्रायलसुद्धा इराणविरोधी आहे, म्हणून दोघांचे हितसंबंध एकसमान आहेत.

5. गुप्त लष्करी व गुप्तचर सहकार्य

  • दोन्ही देशांमध्ये गुप्तचर माहिती शेअरिंग होते.
  • ISIS, इराणसमर्थित दहशतवादी गट यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दोघंही एकत्र काम करतात.

6. अमेरिकेशी मजबूत संबंध 

  • जॉर्डनला अमेरिकेकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळते.
  • इस्रायलशी सहकार्य केल्यामुळे जॉर्डनचे पश्चिमी देशांशी संबंध घट्ट राहतात.

7. पाणी व उर्जा करार

  • जॉर्डन इस्रायलकडून डिसॅलिनेटेड (समुद्राचे गोडे केलेले) पाणी आणि नैसर्गिक वायू खरेदी करतो.
  • या गोष्टी जॉर्डनसाठी अत्यंत गरजेच्या आहेत.

8. संतुलित भूमिका 

  • जॉर्डन इस्रायलचा पूर्ण समर्थनकर्ता नाही.
  • तो पॅलेस्टिनियन अधिकारांना पाठिंबा देतो आणि इस्रायली वसाहत विस्ताराला विरोध करतो.
  • पण स्व:ताच्या हितासाठी व्यावहारिक संबंध राखतो.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0