WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?

लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात WTC Final 2025 सुरू आहे. शुक्रवारी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ होणार आहे. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१२ जून) दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड बेडिंगहॅमने असे काही केले, ज्यामुळे मैदानात गोंधळ निर्माण झाला. नेमके काय झाले, समजून घ्या.

Jun 13, 2025 - 15:20
Jun 14, 2025 - 15:39
 0  1
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?

ब्यू वेबस्टर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ४९वे षटक टाकत होता. डेव्हिड बेडिंगहॅम फलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड बेडिंगहॅमने बचावात्मक फटका खेळला. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी 'फिल्डिंगमध्ये अडथळा आणण्याचे' ( obstructing the field ) अपील केले. बेडिंगहॅमने वेबस्टरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बॅटच्या आतील कडेला लागला आणि त्याच्या पॅडच्या फ्लॅपमध्ये अडकला. यष्टिरक्षक अलेक्स कॅरी चेंडू घेण्यासाठी पुढे जात होता, तेवढ्यात बेडिंगहॅमने स्वतः चेंडू हाताने पॅडमधून काढला आणि पटकन त्याच्या पायाजवळ टाकला. यावर उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथने हळूच अपील केले. पंचांनी आपापसात चर्चा केली आणि चेंडू 'डेड' झाला आहे, म्हणजेच फलंदाज बाद नाही असा निर्णय ठरला. 

लगेचच बेडिंगहॅम बाद झाला...

पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी या घटनेनंतर 'बॉल डेड'चा इशारा दिला. काही लोकांना वाटले की चेंडू डेड झालेला नाही, म्हणूनच हे प्रकरण थोडे वादग्रस्त बनले. परंतु पंचांनी नियमांचे भान ठेवून बेडिंगहॅमला नॉट आउट घोषित केले. सुदैवाने, या निर्णयाचा सामन्यावर फारसा परिणाम होऊ शकला नाही, कारण बेडिंगहॅम (४५) लंचनंतर लगेचच बाद झाला.

आयसीसीचा नियम काय?

आयसीसी नियम ३७.३.१ नुसार, जर एखाद्या फलंदाजाने जाणूनबुजून क्षेत्ररक्षकाला झेल घेण्यापासून रोखले तर तो 'फिल्डमध्ये अडथळा आणणे' या नियमांतर्गत बाद होईल. या प्रकरणात चेंडू जमिनीवर आदळला नसल्याने जर कॅरीने त्याच्या पॅडवरून तो झेलला असता तर बेडिंगहॅम बाद होऊ शकला असता. पण यातही एक ट्विस्ट आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0