गणपती आणि आषाढी उत्सवासाठी गावी जाताना... एसटी तिकिटांवर बंपर डिस्काउंट मिळणार, नवीन निर्णय काय?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. १ जुलै २०२५ पासून १५० किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ बुकिंग करणाऱ्यांना १५% सूट मिळेल. ही सवलत सर्व प्रकारच्या एसटी बसेससाठी लागू आहे.

गेल्या काही दिवसांपासून महागाई सतत वाढत आहे. बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीनंतर आता रेल्वेच्या तिकिटांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. एकीकडे, महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य माणसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीने दिलासा दिला आहे. एसटी प्रवाशांना आजपासून एसटी तिकिटांवर १५% सूट देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) प्रवाशांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार, १ जुलै २०२५ पासून, लांब आणि मध्यम अंतराच्या एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांवर १५ टक्के सवलत दिली जाईल. एसटी महामंडळाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही योजना लागू केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि परवडणारा होईल.
सर्व प्रकारच्या बसेससाठी लागू सवलती
ही एसटी सवलत आज, १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. १५० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा लाभ मिळेल. ही योजना फक्त पूर्ण तिकिटे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना लागू असेल. सध्याच्या सवलतीच्या प्रवाशांना म्हणजेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही सवलत साधी लालपरी, ई-शिवाई, शिवनेरी, सेमी लक्झरीसह सर्व प्रकारच्या बसेससाठी लागू असेल.
एसटी प्रवाशांसाठी फायदेशीर निर्णय
ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या वगळता वर्षभर लागू असेल. गणपती आणि आषाढी एकादशीच्या आरक्षणादरम्यानही या सवलतीचा फायदा मिळेल. महत्त्वाचे म्हणजे, ही सवलत जास्त भाड्याने सोडण्यात येणाऱ्या बसेससाठी लागू राहणार नाही. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फायदा होईल. तसेच, वेळेवर बुकिंग करणाऱ्यांना अधिक किफायतशीर दरात प्रवास करता येईल. एसटी महामंडळाचा हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा असून एसटीच्या सेवांचा अधिकाधिक प्रवाशांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
What's Your Reaction?






