Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं, योजनेबाबत मोठी अपडेट

Dec 29, 2025 - 21:23
 0  0
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं, योजनेबाबत मोठी अपडेट

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर आली असून, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं आहे.

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.  या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये दर महिन्याला जमा करण्यात येतात. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र अशा देखील काही महिला आहेत, ज्या या या योजनेसाठी पात्र नसताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांची नावं योजनेतून वगळण्यासाठी सरकारने आता या योजनेसाठी ई-केवायसी सुरू केली आहे. या योजनेचा लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे.

या योजनेसाठी सुरुवातीला केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांची ई केवायसी बाकी असल्यानं सरकारने के वायसीला मुदतवाढ दिली होती. सरकारकडून ई केवायसीला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ई केवायसी करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. मात्र समोर येत असल्येल्या माहितीनुसार यावेळी सरकार केवायसीची मुदत वाढून देण्याची शक्यता फारच कमी आहे.

दरम्यान या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक महिलांची केवायसी अजूनही बाकी आहे, आणि आता या योजनेसाठी केवायसी करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी वेळेत पूर्ण होणार नाही, त्यांना सन्मान निधी वितरण बंद होऊ शकते, तसेच सरकारकडून देखील या योजनेची केवायसीची मुदत वाढून मिळण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0