शुल्लक वादावरून 11 वर्षांच्या मुलाला वीजेचा शॉक देऊन हत्या
हातकणंगले तालुक्यातील निजामीया मदरशामध्ये एका 11 वर्षांच्या मुलाची विजेचा धक्का देऊन हत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली. अल्पवयीन आरोपी मदरशातून बाहेर पडू इच्छित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हातकणंगले येथे धार्मिक शिक्षण देणाऱ्या निजामीया मदरशामध्ये शिकणाऱ्या एका 14 वर्षांच्या विद्यार्थ्यांने अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला शॉक देऊन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रचंड दहशत माजली आहे. सोमवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे . याप्रकरणी खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील हातकणंगले -वडगांव रस्त्यावर असलेल्या धार्मिक शिक्षण देणारं निजामीया मदरसा असून तिथे 70 ते 80 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी हे परराज्यातील आहेत. घटना घडली त्या दिवशी अर्थात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून सर्व विद्यार्थी झोपी गेले. मात्र रविवार मध्यरात्र ते पहाटेच्या सुमारास 14 वर्षांच्या मुलाने 11 वर्षांच्या फैजान नाजीम ( मुळ राहणार गमहरीय बिहार ) याला वीजेचा शॉक दिला आणि त्याचा खून केला.
अंगावर होते जखमेचे व्रण
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे धार्मिक शिक्षण देणाऱ्या आळते येथील संस्थेत 11 वर्षीय परप्रांतीय मुलाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली होती . मयत फैजानच्या अंगावर जखमेचे व्रण असल्याने हातकणंगलेतील ग्रामिण रुग्णालयाने त्याचा मृतदेह सिपीआर रूग्णालयाकडील फॉरेन्सीक विभागाकडे पाठवला, मात्र त्यामुळे गूढ वाढले होते. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी देखील आपला तपास सुरू केला.
मंगळवारी सकाळी पोलीसी तपासातून व फॉरेन्सीक विभागाकडून मिळालेल्या माहितीतून धक्कादायक माहिती समोर आली. मृत विद्यार्थी फैजान याला विजेचा शॉक देऊन मारण्यात आलं अशी माहिती समोर आली. वारीस वकील आलम (वय १४, रा. बिहार, सध्या निजामीया मदरसा, आळते) या 14 वर्षांच्या मुलाने, निजामीया मदरशामधून बाहेर पडायचे आहे, या कारणावरून, रूम नंबर 2 मध्ये राहणाऱ्या फैजान नाजिम (वय ११) या बालकाला विजेचा शॉक देऊन ठार मारले असे पोलीस तपासातुन समोर आले. ही घटना 15 जून रोजी रात्री 10.45 ते 11 वाजताच्या दरम्यान घडल्याचे ही पोलीस तपासात उघड झाले.
असा झाला खुनाचा उलगडा
मयत विद्यार्थी फैजान नाजिम हा मूळचा अररिया जिल्ह्यातील बगडहारा, बिहार येथील रहिवासी असून सध्या तोसुद्धा आळते येथील मदरशात धार्मिक शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळल्यानंतर त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे त्याला हातकणंगले येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र फैजान याच्या हातावर व पायावर असलेल्या व्रणांमुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले. त्यानंतर झालेल्या फॉरेन्सीक तपासात मात्र मयत फैजान याला शॉक देऊन जिवंत मारल्याचे समोर आले
ब्लेड , वायर , या साहित्याचा वापर करून नियोजनबध्द पध्दतीने आरोपीने फैजानला विजेचा शॉक देण्याची व्यवस्था केली होती. शॉक दिल्यानंतर फैजान ओरडू नये यासाठी त्याचे तोंडही बंद केले होते. त्यानंतर आरोपी मुलगा झोपी गेला. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
What's Your Reaction?






