GST सुधारणा: 10 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करताना किती पैसे द्यावे लागतील? जाणून घ्या हिशोब
भारतामध्ये GST कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. ५, १२, १८ आणि २८ टक्के अशी चार-स्लॅब रचना कमी करून आता फक्त ५% आणि १८% अशा दोन स्लॅबची रचना करण्यात आली आहे. पण सोनं आणि चांदीवर मात्र जीएसटीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
सोनं-चांदीवर GST किती?
-
सोनं आणि चांदीच्या दागिन्यांवर GST: ३% कायम
-
मेकिंग चार्जेसवर GST: ५% कायम
-
सोन्याची नाणी व बार: ३% GST
10 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी हिशोब (किंमत ₹10,650/ग्रॅम)
| तपशील | रक्कम (₹ मध्ये) |
|---|---|
| सोन्याची किंमत (10 ग्रॅम) | 1,06,500 |
| मेकिंग चार्जेस (10%) | 10,650 |
| GST @ 3% (सोन्यावर) | 3,195 |
| GST @ 5% (मेकिंगवर) | 532.5 |
| एकूण GST | 3,727.5 |
| अंतिम रक्कम | 1,20,877.5 |
गुंतवणूकदारांवर परिणाम
GST दरात कपातीची घोषणा झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल केला. त्यामुळे MCX गोल्ड फ्युचर्समध्ये 1% पेक्षा जास्त घसरण झाली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0