बारामतीमध्ये शरद पवार - अजित पवार एकत्र; एकमेकांच्या शेजारी बसणे टाळले
बारामतीमधील एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले. पण यावेळी त्यांनी एकमेकांच्या शेजारी बसणे टाळले आहे. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

बारमतीमधील उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते.
बारमतीमधील उद्घाटन कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असले तरी त्यांनी कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसणे टाळले. यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकमेकांपासून दूर एका खुर्चीवर बसले.
तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्पाचा उद्घाटन कार्यक्रम शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रकल्पांतर्गत व्हर्च्युअल रिअॅलिटी, रोबोटिक्स लॅब, सायन्स ऑन स्फीअर, होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर असे विविध नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. ते विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील.
बारामती येथील कृषी विकास ट्रस्ट येथील विज्ञान आणि नवोन्मेष केंद्र (सायन्स पार्क) ची निवड राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी केली आहे.
राज्यात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर हे तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. त्यामुळे, हा प्रकल्प राज्यातील इतर पाच विज्ञान केंद्रांसाठी पायलट म्हणून काम करेल.
What's Your Reaction?






