ठाकरेंच्या शिवसेनेचे 92 शिलेदार मैदानात, तुमच्या वॉर्डमधून कोणाला उमेदवारी? संपूर्ण यादी एकदा वाचा

Dec 30, 2025 - 15:51
 0  1
ठाकरेंच्या शिवसेनेचे 92 शिलेदार मैदानात, तुमच्या वॉर्डमधून कोणाला उमेदवारी? संपूर्ण यादी एकदा वाचा

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. ९२ उमेदवारांची नावे आणि त्यांचे प्रभाग क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आगामी २०२६ च्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय गणित बदलल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार आहे. या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे ५२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना ठाकरे गट सुमारे १६० ते १६५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील २२७ जागांच्या गणितात मनसेला ५२ जागा सोडण्यात आल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट १६० ते १६५ जागा लढवण्याच्या तयारीत असून आतापर्यंत त्यांनी ९२ पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यांची नावे समोर आली आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी १० ते १२ जागा सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईसह राज्यातील महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही मोठी खेळी खेळली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0