"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात शाब्दिक चकमक झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली.

मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात शाब्दिक चकमक झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.
What's Your Reaction?






