महिला IPS अधिकाऱ्याबद्दल भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान; “कुत्र्यासारखे वागतात”
दावणगेरे | कर्नाटक राजकारण – कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भाजप नेत्याच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार बीपी हरीश यांनी महिला आयपीएस अधिकारी उमा प्रशांत यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद टिप्पणी केली.
काय म्हटलं आमदारांनी?
बुधवारी दावणगेरे शहरात रिपोर्टर्स गिल्डच्या कार्यक्रमात बोलताना बीपी हरीश म्हणाले –
“मी आमदार असूनही जेव्हा एसपी मला कोणत्याही कार्यक्रमात पाहतात, तेव्हा तोंड फिरवतात. मात्र, काँग्रेस नेते शमनूर कुटुंबातील सदस्यांची वाट गेटवर उभी राहून पाहतात. तेव्हा त्या त्यांच्या घरात पोमेरेनियन कुत्र्यासारखे वागतात.”
या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली आहे.
एफआयआर दाखल
महिला आयपीएस अधिकाऱ्याबद्दल अपमानजनक विधान केल्यामुळे बीपी हरीश यांच्याविरुद्ध दावणगेरे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शमनूर शिवशंकरप्पा कुटुंबाचा या भागात मोठा राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
याआधीही वादग्रस्त विधाने
कर्नाटकमध्ये गेल्या काही महिन्यांत हे तिसरे प्रकरण आहे, जिथे राजकीय नेत्याने नोकरशहांचा अपमान केला आहे.
-
जुलै २०२४ : भाजप एमएलसी एन रविकुमार यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याबाबत वक्तव्य करताना म्हटले –
“त्या दिवसा नेहमी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कामात व्यस्त असतात आणि रात्री सरकारी कर्तव्य पार पाडतात.” -
याआधी त्यांनी गुलबर्गाचे उपायुक्त फौजिया तरन्नम यांच्याबाबत “त्या पाकिस्तानातून आले असावेत” असे विधान केले होते.
या सर्व घटनांमुळे विरोधकांनी भाजपवर ‘महिला अधिकार्यांचा अवमान करणारा पक्ष’ असल्याचा आरोप केला आहे.
नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांवर टीका
सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी या विधानांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिलांविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या नेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0