रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

बिझनेसमन आणि करिष्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर(Sunjay Kapur) यांचं काल लंडनमध्ये निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. पोलो खेळताना मधमाशी तोंडात गेली आणि त्यांना हार्टअॅटॅक आला. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. संजय कपूर यांनी तीन लग्न केले. करिष्मा कपूर त्यांची दुसरी पत्नी होती. तर प्रिया सचदेव तिसरी पत्नी आहे. पण संजय कपूर यांची पहिली पत्नी कोण होती माहितीये का?
संजय कपूर यांनी १९९६ साली नंदिना महतानीशी (Nandita Mahtani) लग्न केलं होतं. लग्नानंतर लग्नानंतर ४ वर्षातच २००० साली त्यांचा घटस्फोट झाला. नंदिना प्रसिद्ध स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर आहे. तिने अनेक सेब्रिटींनालि स्टाईल केलं आहे. ग्लॅमरच्या जगात तिचं मोठं नाव आहे. ५५ वर्षीय नंदिता दिसायला अतिशय सुंदर आहे. नुकतीच ती आदर जैनच्या रिसेप्शन पार्टीत दिसली होती. करण जोहरसोबत ती पोज देत होती.
रणबीरची क्रश, विराट कोहलीसोबत कनेक्शन
नंदिता महतानी फॅशन डिझायनर. ती आणि डिनो मोरिया यांचा प्लेग्राऊंड हा ब्रँड आहे. तिने अनेक सेलिब्रिटींना स्टाईल केलं आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीचीही ती स्टायलिस्ट राहिली आहे. तिच्या सोशल मीडियावर विराटचे अनेक फोटो आहेत. २०१९ साली तिने विराट कोहलीच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं होतं. तर दुसरीकडे रणबीर कपूरसोबत तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती. एका मुलाखतीत रणबीरने नंदितावर क्रश असल्याचा खुलासाही केला होता. मात्र दोघांनी कधीच रिलेशनशिप कन्फर्म केलं नाही. यानंतर डिनो मोरियासोबतही तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या.
नंदिना महतानी आणि विद्युत जामवाल यांचं अफेअर होतं. २०२१ मध्ये विद्युतने रिलेशनशिप कन्फर्मही केलं होतं. त्यांचं लग्नाचंही प्लॅनिंग होतं. मात्र नंतर त्यांचं नातं तुटलं.
What's Your Reaction?






