सुस्साट 'हाऊसफुल्ल 5'च्या कमाईत सहाव्या दिवशी घट; तरीसुद्धा 150 कोटींपासून इंचभर दूर, किती कमावले?

'हाऊसफुल 5' नं आतापर्यंत दमदार कमाई केली आहे. अशातच कमाईत घट होऊनही लवकरच सिनेमा 150 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

Jun 12, 2025 - 16:21
Jun 14, 2025 - 15:51
 0  2
सुस्साट 'हाऊसफुल्ल 5'च्या कमाईत सहाव्या दिवशी घट; तरीसुद्धा 150 कोटींपासून इंचभर दूर, किती कमावले?

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'हाऊसफुल 5' (Housefull 5) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धमाल करतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. यासोबतच, आठवड्याच्या दिवशीही सिनेमाची कमाई दोन आकड्यांत असल्याचं पाहायला मिळतंय. 'हाऊसफुल 5'नं रिलीजच्या 5 दिवसांत त्याच्या भांडवलाच्या 50 टक्क्यांहून अधिक वसुली केली आहे. 'हाऊसफुल 5'नं रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच, बुधवारी किती कोटींची कमाई केली? ते सविस्तर जाणून घेऊयात...  

'हाऊसफुल 5'नं सहाव्या दिवशी किती कमाई केली?

'हाऊसफुल 5'ची रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चा झालेली. पहिली गोष्ट म्हणजे, हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. यामध्ये अनेक दिग्गज एकत्र झळकले आहेत. तसेच, हा सिनेमा दोन वर्जनमध्ये रिलीज करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत 'हाऊसफुल 5'ची क्रेझ शिगेला पोहोचली होती. अपेक्षेप्रमाणे, चित्रपटाची सुरुवात चांगली झाली, आणि नंतर सिनेमानं आपली बॉक्स ऑफिसवरची पकड घट्ट केली. विकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता विकडेजमध्येही सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 'हाऊसफुल 5'नं 24 कोटींची सुरुवात केली, त्यानंतर आठवड्याच्या शेवटी, शनिवारी 31 कोटी आणि रविवारी 32.5 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी, सोमवारी, चित्रपटानं 13 कोटींची कमाई केली आणि पाचव्या दिवशी, मंगळवारी, 11.25 कोटींची कमाई केली.

सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5'नं रिलीजच्या सहाव्या दिवशी, म्हणजे बुधवारी 8 कोटींची कमाई केली आहे. यासह, 'हाऊसफुल 5'चं 6 दिवसांत एकूण कलेक्शन आता 119.75 कोटी रुपये झालं आहे.

'हाऊसफुल 5' 150 कोटींपासून किती दूर? 

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करतोय. दरम्यान, बुधवारी सिनेमाच्या कमाईत लक्षणीय घट झाली. 'हाऊसफुल 5'नं सहाव्या दिवशी आतापर्यंतचं सर्वात कमी कलेक्शन केलं. आता तो 150 कोटींच्या आकड्याकडे वेगानं वाटचाल करतोय. दरम्यान, त्याला 150 कोटींचा आकडा गाठण्यासाठी अजून 35 कोटींची कमाई करायची आहे. दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपट हा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे.

'हाऊसफुल 5' हिट की फ्लॉप? 

'हाऊसफुल 5' बनवण्यासाठी तब्बल 240 कोटींचं भांडवल लागलं आहे. अशातच आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करत असला तरीसुद्धा त्याचं भांडवल कमावेल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एखादा सिनेमा हिट की फ्लॉप हे त्याच्या कमाईवरुन समजतं. जर, सिनेमानं त्याचं भांडवल वसूल करुन त्यानंतर धुवांधार कमाई केली, तर तो सिनेमा हिट झाला, असं म्हणू शकता. पण, जर सिनेमा त्याचं भांडवल वसूल करू शकला नाहीतर तो फ्लॉप आहे, असं म्हटलं जातं. 

दरम्यान, तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल 5'मध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी एकत्र झळकले आहेत. यामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, श्रेयस तळपदे, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सौंदर्या शर्मा, सोनम बाजवा आणि चंकी पांडे यांसारखे अनेक कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0