खड्डा खणताना सोनं मिळालं" म्हणत व्यापाऱ्याची फसवणूक; २ लाख देऊन घेतलं बनावट सोने!

अमरावतीत अचलपूर येथील व्यापाऱ्याची फसवणूक. दोन लाख रुपये देऊन एक किलो बनावट सोने दिलं. नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

Sep 14, 2025 - 14:18
 0  5
खड्डा खणताना सोनं मिळालं" म्हणत व्यापाऱ्याची फसवणूक; २ लाख देऊन घेतलं बनावट सोने!

अमरावती :
अचलपूर शहरात दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात बनावट सोने देऊन एका व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली. ही घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नागपुरी गेट परिसरातील डीएड कॉलेजजवळ घडली.

या प्रकरणी मुरारीलाल तांबी (५२, रा. चावडी मंडी, अचलपूर) या किराणा व्यापाऱ्याची फसवणूक झाली असून, नागपुरी गेट पोलिसांनी राजू सिंग (रा. राजस्थान) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

२६ ऑगस्ट रोजी दोन अनोळखी इसम तांबी यांच्या दुकानात आले. त्यातील एकाने स्वत:ला राजू सिंग असे नाव सांगितले आणि म्हणाला की "आम्ही रस्ता बांधकामावर काम करतो. खड्डा खणताना आम्हाला सोन्यासारखी वस्तू मिळाली आहे, तुम्हाला विकत घ्यायची आहे का?" त्यानंतर मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली.

३१ ऑगस्ट रोजी रात्री फोनवरून तांबी यांना बोलावण्यात आलं. १ सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे नागपुरी गेट परिसरात तांबी गेले. त्याठिकाणी दोन लाख रुपयांमध्ये एक किलो "सोने" देण्यात आलं. पण नंतर लक्षात आलं की दिलेली वस्तू बनावट आहे.

याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर १० सप्टेंबर रोजी नागपुरी गेट पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0