हा तर माझा गेम करण्याचा भाजपचा डाव”, बच्चू कडूंचा पलटवार; म्हणाले “कारवाई सूडबुद्धीतून

बच्चू कडू म्हणाले, भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे.

Jun 17, 2025 - 15:56
 0  0
हा तर माझा गेम करण्याचा भाजपचा डाव”, बच्चू कडूंचा पलटवार; म्हणाले “कारवाई सूडबुद्धीतून

 प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह केला. सात दिवसांनंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. बच्चू कडू यांना घेरण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळत आहे. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात आले, हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमांकडूनच कळले. मला अपात्र ठरवले जाते आणि त्याची साधी नोटीसही आपल्याला दिली जात नाही, याचे आश्चर्य वाटते. आपल्यावरील ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही संचालकांनी आपल्याला अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यांचा वापर करून भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0