फुल बाजारात लाखोंची उलाढाल; आसमानी दराने विक्री

अमरावती शहरातील फुल बाजारात सध्या उत्सवाचा माहोल रंगला आहे. गणेशोत्सव आणि गौरी-गणपती आगमनामुळे फुलांच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे. या मागणीमुळे बाजारात दर गगनाला भिडले असून, तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Sep 2, 2025 - 16:37
 0  4
फुल बाजारात लाखोंची उलाढाल; आसमानी दराने विक्री

फुलांचे दर आकाशाला भिडले

  • अस्टर : एरवी २० रुपये किलो मिळणारा अस्टर सध्या तब्बल २०० रुपये किलो दराने विकला जात आहे.

  • गुलाब : गुलाबाची किंमत ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.

  • कमळ : सणासुदीला आवडते कमळाचे फूल सध्या ४० रुपये प्रती फूल दराने विकले जात आहे.

  • गजरे व वेण्या : महालक्ष्मी पूजेसाठी गजरे ८० ते ९० रुपये, तर शेवंतीच्या वेण्या ४० रुपये दराने उपलब्ध आहेत.

बाहेरून येणारा फुलांचा माल

अमरावती बाजारपेठेत दररोज पुणे, अहमदनगर, हैदराबाद, शिर्डी आणि अंबेजोगाई येथून एक ते दोन ट्रक फुलांचा माल येतो. सणासुदीच्या दिवसांत ही संख्या आणखी वाढते.

हार-गजऱ्यांना मोठी मागणी

गणेशोत्सव आणि महालक्ष्मी आगमनामुळे गुलाबाच्या हारांना सर्वाधिक मागणी आहे. हारांच्या किंमती १,००० ते ५,००० रुपये जोडी इतक्या दरम्यान आहेत. निशिगंधाच्या गजऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असून, महिलांसाठी वेण्या विक्रीत मोठी उलाढाल होत आहे.

व्यापाऱ्यांची चांदी

गौरी-गणपतीच्या आगमनानंतर केवळ तीन दिवसांत फुल बाजारात लाखोंची उलाढाल झाली आहे. भाव वाढले तरी ग्राहक मात्र उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0