13 सिक्सर, 48 बॉलमध्ये शतक, ग्लेन मॅक्सवेलची तुफानी खेळी

ग्लेन मॅक्सवेल याला आयपीएलच्या 18 व्या मोसमात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र ग्लेनने एमएलसी लीगमध्ये झंझावाती शतक झळकावलं. मॅक्सवेलने त्याच्या खेळीत 13 षटकार लगावले.

Jun 18, 2025 - 12:36
 0  0
13 सिक्सर, 48 बॉलमध्ये शतक, ग्लेन मॅक्सवेलची तुफानी खेळी

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने अनेकदा तोडफोड बॅटिंगच्या जोरावर टीमला एकहाती विजय मिळवून दिला आहे. मॅक्सवेल याने अनेकदा निर्णायक क्षणी स्फोटक बॅटिंग करुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिलाय. मॅक्सवेलने भारतात 2023 साली झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना केलेली द्विशतकी खेळी प्रत्येक चाहत्याच्या लक्षात आहे. मॅक्सवेलने अवघ्या काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटला रामराम केला. मॅक्सवेलने 2 जून रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र टी 20i मध्ये खेळत राहणार असल्याचं मॅक्सवेलने स्पष्ट केलं होतं. मॅक्सवेलने वनडे रिटायरमेंटच्या काही दिवसांनंतरच तोडफोड शतकी खेळी केली आहे.

मॅक्सवेलचा शतकी तडाखा

मॅक्सवेल याने एमएलसी अर्थात मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत वॉशिंग्टन फ्रीडमकडून खेळताना लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्ध झंझावाती शतक ठोकलंय. मॅक्सवेलने एमएलसी 2025 स्पर्धेतील 8 व्या सामन्यात अवघ्या 48 बॉलमध्ये 12 सिक्स आणि 2 फोरसह हे शतक पूर्ण केलं. मॅक्सवेलच्या टी 20 कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. विशेष म्हणजे मॅक्सवेलने सहाव्या स्थानी बॅटिंग करताना हा कारनामा केला आहे. तसेच मॅक्सवेलने या संपूर्ण खेळीत एकूण 13 षटकार लगावले.

मॅक्सवेलची तोडू खेळी

मॅक्सवेलने या सामन्यात 49 चेंड़ूत नाबाद 106 धावांची नाबाद खेळी केली. मॅक्सवेलने 216.32 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. मॅक्सवेलने या खेळीत 13 षटकार लगावले. मॅक्सवेलने केलेल्या या खेळीमुळे वॉशिंग्टन फ्रीडमने 5 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. मॅक्सवेलनंतर गोलंदाजांनी कमाल केली आणि प्रतिस्पर्धी संघाला 16.3 ओव्हरमध्ये 95 रन्सवर गुंडाळलं. वॉशिंग्टन फ्रीडमने अशाप्रकारे 113 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0